प्रस्ताव दाखल करा

🌸 बि द चेंज फाउंडेशन प्रस्तुत 🌸

सौंदर्य कला पुरस्कार २०२६

सौंदर्य उद्योग हा सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि समाजातील सकारात्मक परिवर्तन यांचा पाया आहे. मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, ब्युटिशियन, स्किन एक्स्पर्ट आणि ब्युटी ट्रेनर्स आपल्या कौशल्य, कल्पकता आणि समर्पणातून प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीमुळे सौंदर्य क्षेत्र आज नवनवीन उंची गाठत आहे. या योगदानाची दखल घेत, “बि द चेंज फाउंडेशन” अभिमानाने सादर करते — “सौंदर्य कला पुरस्कार २०२६” हा एक प्रतिष्ठित सन्मान सोहळा आहे जो सौंदर्य क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोन्मेष आणि नेतृत्वाचा गौरव करतो. या कार्यक्रमात देशभरातील त्या कलाकारांचा सन्मान केला जातो ज्यांनी आपल्या कलागुणांमुळे ब्युटी इंडस्ट्रीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे — मग ते ब्राइडल मेकअप असो, हेअर डिझाईन, स्किन केअर, ब्युटी ट्रेनिंग किंवा डिजिटल इन्फ्लुएन्सर क्षेत्रातील नावीन्य असो. या पुरस्काराचा उद्देश म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीतील व्यावसायिकांना एकसंध व्यासपीठावर आणणे, नेटवर्किंग आणि प्रेरणादायी संवादास प्रोत्साहन देणे. तसेच या माध्यमातून सौंदर्य क्षेत्रातील गुणवत्ता, शिक्षण आणि नवनवीन प्रयोग यांना चालना देणे हा फाउंडेशनचा प्रमुख हेतू आहे. “सौंदर्य कला पुरस्कार २०२६” हा केवळ सन्मान नव्हे, तर या क्षेत्रातील प्रतिभावंतांना उज्ज्वल भविष्याकडे नेणारा एक प्रेरणादायी टप्पा आहे.

सौंदर्य कला पुरस्कार २०२६

तुमच्या कलेचा सन्मान करा — योग्य श्रेणी निवडा आणि नामांकन करा!

सौंदर्य कला पुरस्कार २०२६ - महत्वाच्या लिंक्स

JEE Main + Advanced
माहितीपत्रक डाऊनलोड करा
Click Here
JEE Main
ऑनलाईन प्रस्ताव दाखल करा
Click Here
JEE Main + Advanced
हमीपत्र
Click Here
NEET-UG
नामनिर्देशन शुल्क भरा
Click Here
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

मुंबई · १८ जानेवारी २०२६

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न बी द चेंज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील आरंभ हॉलमध्ये अत्यंत उत्साह आणि थाटामाटात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

या सोहळ्यात देशातील विविध राज्यांमधील गुणवंत, समर्पित व सामाजिकदृष्ट्या बांधील असलेल्या शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक योगदानासाठी सन्मान करण्यात आला. सर्वांगीण विद्यार्थी विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि सामाजिक कल्याणासाठी राबवलेल्या उपक्रमांद्वारे या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

बी द चेंज फाउंडेशनच्या या उपक्रमामागील उद्देश शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांचा सन्मान व प्रतिष्ठा वाढून शिक्षण क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अधिक माहिती

सौंदर्य कला पुरस्कार २०२६ - वैशिष्ट्ये

JEE Main + Advanced
पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक निवड प्रक्रिया
JEE Main
आलेल्या सर्व प्रस्तावांचे डिजिटल रेकॉर्ड मेंटेनन्स
NEET-UG
ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल सुविधा
Pre-Nurture and Career Foundation
ऑफलाईन पद्धतीने ही प्रस्ताव दाखल सुविधा
JEE Main + Advanced
₹ २,५००/- मात्र नामनिर्देशन शुल्क
JEE Main
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गौरव
NEET-UG
सौंदर्य क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेचा उपक्रम
Pre-Nurture and Career Foundation
कार्यक्रमास नामवंत व्यक्तींची उपस्थिती

प्रस्तावासाठी महत्वाच्या आवश्यक अटी व शर्ती

अर्जदार सौंदर्य, मेकअप, हेअरस्टाइल, स्किन केअर, ब्युटी ट्रेनिंग, फोटोग्राफी, फॅशन डिझाईन, किंवा संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक असावा.

अर्जदार सध्या नोंदणीकृत ब्युटी पार्लर, सलून, अकॅडमी, स्टुडिओ किंवा संस्थेशी कार्यरत असावा.

किमान १ वर्षाचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे.

सादर केलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे खरी, वैध आणि दिशाभूल न करणारी असावीत.

आयोजक समितीकडून अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची व पात्रतेची तपासणी/पडताळणी केली जाऊ शकते.

निलंबन, शिस्तभंग, किंवा कायदेशीर गुन्हा यांमध्ये सहभागी असलेला अर्जदार नामांकनासाठी पात्र राहणार नाही.

संस्थेच्या श्रेणीतील नामांकनासाठी, संबंधित संस्था कायदेशीररित्या नोंदणीकृत असावी.

सामाजिक उपक्रम किंवा सार्वजनिक हितातील कार्यासाठी नामांकन करताना, कार्याचा पुरावा (मीडिया कव्हरेज, सरकारी प्रमाणपत्र, NGO/CSR संलग्नता) आवश्यक आहे.

आवश्यक पुरावे जसे की प्रशिक्षण प्रमाणपत्र, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त कोर्सचे सर्टिफिकेट इ. अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्जदार कोणत्याही न्यायालयीन गुन्ह्यात दोषी ठरलेला नसावा तसेच व्यावसायिक गैरवर्तनाचा आरोप सिद्ध झालेला नसावा.

खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास नामांकन तत्काळ रद्द करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

आयोजक मंडळास कोणतेही नामांकन कारण न देता नाकारण्याचा अधिकार राहील.

पुरस्कार प्रक्रियेत सहभागी होताच वरील सर्व अटी व शर्तींची स्वीकृती दिली आहे असे गृहित धरले जाईल.

सौंदर्य क्षेत्रातील व्यावसायिक — जसे की मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, स्किन एक्स्पर्ट, ब्युटी ट्रेनर्स, फॅशन व फोटोग्राफी क्षेत्रातील कलाकार — हे समाजात आत्मविश्वास, सौंदर्य आणि सर्जनशीलतेचा संगम घडवतात. त्यांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळे अनेक व्यक्तींना नवीन ओळख, नवा आत्मविश्वास आणि यश मिळते. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या असंख्य प्रतिभावान कलाकारांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. या समर्पित आणि उत्कृष्ठ व्यक्तींचा गौरव करण्यासाठी “बी द चेंज फाउंडेशन” (नोंदणीकृत) अभिमानाने सादर करत आहे — “सौंदर्य कला पुरस्कार २०२६”, जो सौंदर्य क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोन्मेष आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करतो.



राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५

दि. २९ जून २०२५ रोजी शिर्डी, महाराष्ट्र येथे संपन्न.
या प्रतिष्ठित कार्यक्रमात आदर्श शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला असून राज्यभरातील १३०० हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


नॅशनल क्वालिटी अवॉर्ड्स २०२४

२८ सप्टेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीमध्ये पार पडले.

हा व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी आहे! आमची संस्था २०२६ मध्ये भव्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा याचप्रमाणे आयोजित करण्याचा मानस ठेवते.
पुरस्कार सोहळा २०२६

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

१८ जानेवारी २०२६

दिनांक : १८ जानेवारी २०२६

बी दि चेंज फाउंडेशन यांच्या वतीने मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ अत्यंत यशस्वी व दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश देशभरातील आदर्श, गुणवंत व कर्तृत्ववान शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे हा होता.

या पुरस्कार सोहळ्यास भारतातील विविध राज्यांमधील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर पाहुण्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. शिक्षकांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.

सौंदर्य कला पुरस्कार २०२६ प्रस्तावासाठी आवश्यक निकष

नामांकित व्यक्ती ही नोंदणीकृत ब्युटी, मेकअप, हेअर, स्किन केअर, फॅशन किंवा फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिक असावी.

आपल्या कार्यामध्ये सातत्याने नैतिकता, सर्जनशीलता आणि ग्राहक-केंद्रित सेवा दाखवलेली असावी.

कोणत्याही प्रकारचे शिस्तभंग, गैरवर्तन, किंवा कायदेशीर कारवाईचे प्रकरण प्रलंबित नसावे.

आपल्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणारे नाविन्यपूर्ण तंत्र, डिझाईन, स्टाइलिंग किंवा क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट्स यांचा पुरावा असावा.

प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि व्यावसायिक जबाबदारी या तत्त्वांचे पालन केलेले असावे.

समाजातील सकारात्मक बदलासाठी सोशल इनिशिएटिव्ह, मोफत प्रशिक्षण शिबिरे, ग्रामीण भागातील सेवा, किंवा महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम केलेले असावेत.

ग्राहक समाधान, सोशल मीडिया किंवा कम्युनिटी फीडबॅक यावर आधारित प्रतिष्ठा किंवा मान्यता असावी.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर — जसे की डिजिटल मेकअप, ऑनलाईन ब्युटी ट्रेनिंग, फॅशन फोटोग्राफी, किंवा ट्रेंडिंग स्टाइल इनोव्हेशन केलेले असावे.

टीमवर्क, नेतृत्व आणि सहयोगी वृत्ती दाखवलेली असावी.

प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, वर्कशॉप्स किंवा मास्टरक्लासेसद्वारे सतत शिक्षण आणि प्रगतीची वृत्ती असावी.

व्यावसायिक अनुभव किमान १ वर्षाचा असावा (अत्यंत नाविन्यपूर्ण किंवा प्रेरणादायी कार्य असल्यास अपवाद मान्य).

स्पर्धा, प्रदर्शन, फॅशन शो, सेमिनार, ब्युटी कॅम्प्स इत्यादींमध्ये सक्रीय सहभाग केलेला असावा.

क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी या तिन्हींचा सुंदर संगम आपल्या कार्यातून दिसला पाहिजे.

विशेष विचार त्या कलाकारांना केला जाईल ज्यांनी कोविड किंवा इतर संकट काळात समाजासाठी नि:स्वार्थ सेवा दिली आहे.

उद्योगातील योगदान व प्रेरणादायी प्रभाव — आपल्या कार्यामुळे इतर कलाकारांना प्रेरणा मिळाली असेल किंवा उद्योगातील विकासात मोलाचे योगदान दिलेले असावे.

ब्रँड, संस्था किंवा सामाजिक उपक्रमांद्वारे सकारात्मक प्रतिमा निर्माण — समाजात, ग्राहकांमध्ये किंवा ब्युटी इंडस्ट्रीत आपल्या नावाची विश्वासार्ह आणि सन्माननीय ओळख निर्माण झालेली असावी.

सौंदर्य कला पुरस्कार २०२६ - विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Ans. “Be The Change Foundation” तर्फे आयोजित हा पुरस्कार कार्यक्रम महाराष्ट्रातील ब्युटी, मेकअप, हेअर, स्किन, स्पा, नेल आर्ट आणि फॅशन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी आहे.

Ans. ब्युटी एक्स्पर्ट, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, स्किन थेरपिस्ट, स्पा प्रोफेशनल, नेल आर्टिस्ट, फॅशन डिझायनर, सलून/अकॅडमी मालक तसेच ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षक व संस्थापक अर्ज करू शकतात.

Ans. www.saundaryapuraskar.com या संकेतस्थळावर “नामांकन भरा” या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Ans. होय, तुम्ही वेबसाईटवरून नामांकन फॉर्म डाउनलोड करून तो भरावा व आवश्यक कागदपत्रांसह saundaryapuraskar@gmail.com या ईमेलवर पाठवावा.

Ans. व्यावसायिक प्रमाणपत्र, ओळखपत्र (आधार/पॅन), सलून/अकॅडमी नोंदणी पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, पुरस्कार किंवा मीडिया कव्हरेजचे पुरावे, तसेच ग्राहक अभिप्राय असल्यास जोडावेत.

Ans. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२६ आहे.

Ans. सर्व अर्ज “Be The Change Foundation” च्या तज्ज्ञ समितीद्वारे तपासले जातील. निवड कौशल्य, गुणवत्ता, समाजातील योगदान आणि प्रामाणिकतेच्या आधारे केली जाईल.

Ans. विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल व विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

Ans. नामांकन शुल्क फक्त ₹ २,५००/- असून ते वेबसाईटवरून ऑनलाइन भरता येईल.

Ans. पुरस्कार वितरण सोहळा १७ मे २०२६ रोजी शिर्डी येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

सौंदर्य कला पुरस्कार २०२६


उपस्थित राहणार असणारे मान्यवर

सौंदर्य, फॅशन, मेकअप, हेअर, स्किन आणि सौंदर्य शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वे या भव्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

बी दी चेंज फाउंडेशन अंतर्गत झालेले आमचे इतर उपक्रम

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 3 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 9 Paper Cut 10 Paper Cut 11

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 3 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 9 Paper Cut 10 Paper Cut 11 Paper Cut 12 Paper Cut 13

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – १८ जानेवारी २०२६ - वृत्तपत्र दृष्टीचित्र

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 3

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – १८ जानेवारी २०२६ - वृत्तपत्र दृष्टीचित्र

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 3

सौंदर्य कला पुरस्कार २०२६


आयोजक मंडळ

मा. मयूर ढोकचौळे सर
अध्यक्ष

मा. मयूर ढोकचौळे सर

अध्यक्ष, सौंदर्य कला पुरस्कार २०२६

अध्यक्ष, बी द चेंज फाउंडेशन

संचालक, स्केलझेन टेक्नॉलॉजी'ज प्रायव्हेट लिमिटेड

https://scalezen.in/

मयूर ढोकचौळे हे Scalezen Technologies Private Limited या शैक्षणिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रचंड अनुभव असून, त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यम शाळा आणि NDA अकॅडमीमध्ये पाच वर्षे प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.

फक्त एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी Scalezen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली. या कंपनीमार्फत ते विविध शाळा, कॉलेजेस आणि NDA/NEET/JEE अकॅडमीसाठी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन, व्यवस्थापन सुलभीकरण आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देत आहेत.

ScaleZen ही कंपनी सध्या शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालये अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये आपली कन्सल्टन्सी सेवा पुरवत आहे. या सर्व संस्थांमध्ये ScaleZen कंपनी अकॅडेमिक, ऍडमिनीट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, अ‍ॅडमिशन कन्सल्टन्सी, शैक्षणिक धोरण आखणी आणि व्यवस्थापन या क्षेत्रात सल्ला व सेवा पुरवत आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अभ्यासक्रमानुसार सराव करता यावा यासाठी त्यांनी "परीक्षा पोर्टल" या मोबाइल व वेब ॲपची निर्मिती केली आहे. आज अनेक विद्यार्थी या ॲपचा लाभ घेत असून, त्याचा उपयोग दैनिक सराव, डेली टेस्ट्स, स्टडी मटेरियल आणि निकाल व्यवस्थापनासाठी केला जातो.

“बी. द चेंज फाउंडेशन” तर्फे दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी “सौंदर्य कला पुरस्कार २०२६” या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, स्किन एक्स्पर्ट, ब्युटी ट्रेनर्स, ब्युटिशियन, फोटोग्राफर्स तसेच फॅशन व ब्युटी इंडस्ट्रीतील इतर कलाकार यांच्या उल्लेखनीय, होतकरू आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे. आपल्या हस्ते या मान्यवरांचा गौरव होणे — हे आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.

सौंदर्य उद्योग हा केवळ रूप आणि शैलीचा नव्हे तर आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा उत्सव आहे. अनेक कलाकार आपल्या कलागुणांद्वारे समाजात आत्मविश्वास निर्माण करत आहेत, परंतु त्यांचा योग्य सन्मान अनेकदा होत नाही. त्यांच्या समर्पणाचा आणि कलात्मक योगदानाचा गौरव करणे — हेच या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सौंदर्य आणि कलाक्षेत्रात उत्कृष्टता, नवोन्मेष आणि सामाजिक जबाबदारी जोपासणाऱ्या कलाकारांचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळवून देणे — हेच “सौंदर्य कला पुरस्कार २०२६” चे खरे ध्येय आहे. हा सोहळा म्हणजे भारतातील प्रत्येक सर्जनशील कलाकारासाठी गौरव, प्रेरणा आणि कलात्मकतेचा उत्सव आहे.

मा. अभिषेक तुपे सर

उपाध्यक्ष, सौंदर्य कला पुरस्कार २०२६

श्री. अभिषेक तुपे सर हे "सौंदर्य कला पुरस्कार २०२६" चे उपाध्यक्ष असून, या उपक्रमामागील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. सौंदर्य, कला आणि फॅशन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्याचा त्यांचा दृढ हेतू आहे. मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, स्किन एक्स्पर्ट, ब्युटिशियन, फॅशन आर्टिस्ट, फोटोग्राफर आणि ब्युटी इंडस्ट्रीतील कार्यरत कलाकार यांना त्यांच्या निष्ठा आणि कर्तृत्वासाठी योग्य सन्मान मिळावा — हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

त्यांचा ठाम विश्वास आहे की “प्रत्येक समर्पित आणि सर्जनशील कलाकाराचा सन्मान होणे आवश्यक आहे.” ह्या विचारातूनच श्री. तुपे यांनी “बी. द चेंज फाउंडेशन”च्या माध्यमातून “सौंदर्य कला पुरस्कार २०२६” ही संकल्पना साकारली आहे, जी महाराष्ट्रभरातील प्रेरणादायी आणि उत्कृष्ट कलावंतांचा गौरव करते.

श्री. तुपे यांचा हा उपक्रम प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणास्त्रोत ठरतो, जो आपल्या कार्यात समर्पण, सर्जनशीलता आणि प्रामाणिकपणा जपत समाजात सकारात्मक बदल घडवतो. हा पुरस्कार सोहळा त्यांच्या कलात्मक कार्याचा सन्मान करतो, त्यांना योग्य मान्यता देतो आणि नव्या पिढीला आपल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा देतो.

मा. अभिषेक तुपे सर
उपाध्यक्ष

कार्यालयीन पत्ता

बी . द. चेंज फाउंडेशन ( रजि. महा. २२०/२२)

🏢 मुख्य कार्यालय : मुंबई

📍प्रादेशिक कार्यालय : दूसरा मजला, जानकी प्लाझा, भगवान महावीर पथ कोपरगाव,
ता. कोपरगाव, जि. अहमदनगर,
पिन कोड - ४२३६०१
+91 7719032192
+91 8796696960
+91 7066959520
saundaryaakalaa@gmail.com
bethechange.org.in